मनोरंजन

अभिनेत्री रुचिता जाधवला “पूर्व युरोप अंतराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार”

मराठी चित्रसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रुचिता जाधव हिला “एनिग्मा – द फॉलन एंजेल” या शॉर्ट फिल्म साठी “पूर्व युरोप अंतराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार” सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळणारी रुचिता ही भारतातील पहिली अभिनेत्री आहे. नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला.

हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर रुचिता ही प्रचंड खुश असून गेल्या दोन दशकापासून चित्रपट, मालिका सृष्टीत ती कार्यरत आहे.
या प्रसंगी रुचिता म्हणाली की हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा असून याचं सर्व श्रेय मी माझ्या आईला देते. त्याच बरोबर या शॉर्ट फिल्म मधील अभिनयाचासाठी दिग्दर्शक अभय ठाकूर यांनी खूप मेहनत करून घेतली. त्यामुळे त्यांनाही याच श्रेय जातं.

 

सर्व समाज माध्यमातून रुचितावर कौतुकाचा वर्षाव होत असून “एनिग्मा” या लघुपटात रुचिता जाधव बरोबर अभिनेते यतीन कार्येकर असून हा लघुपट रसिकांना ओटीटी या माध्यमावर लवकरचं पाहायला मिळेल असे रुचिता जाधव यांनी सांगितले.

Related posts

प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज

Vishal Khandagale

कोरोना बाधित रुग्णांन च्या… सिस्टर सुवर्णा चा अनुभव !

Vishal Khandagale

जागतिक ग्राहक दिन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.