पुणे

पहिल्या क्रांतिकारी विद्यार्थिनी ; यांचा पुतळा पुणे विद्यापीठात बसवा- विजय डाकले

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापिठ पुणे या परिसरामध्ये देशातील पहिली क्रांतीकारी विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांचा पुतळा बसवावा आणि मुलींच्या वसतीगृहास मुक्ता साळवे यांचे नाव द्यावे अशी मागणी आज सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरु मा. नितिनजी कळमळकर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय बापु डाकले यांनी केली.
शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणा-या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेला संघर्ष आणि त्यांची पहिली विद्यार्थिनी म्हणुन मुक्ता साळवे या इतिहासात अजरामर आहेत. पुणे विद्यापीठाला सावित्रीमाई फुले यांचे नाव देऊन सरकारने त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे, मुक्ता साळवे यांचा पुतळा बसवून व वस्तीगृहास त्यांचे नाव देऊन त्यांच्याही क्रांतीकारी कार्याला ऊजाळा द्यावा यासाठी आज विजय डाकले यांनी विद्यापीठाचे कुलगुरु नितिनजी कळमळकर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कुलगुरुंनी याबाबत नाव देण्याबाबत सकारात्कमता दाखवून नाव देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
या बैठकीसाठी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ बचाव कृती समितीचे अध्यक्ष विनोद शिंदे, राष्ट्रवादीचे युवक शहर ऊपाध्यक्ष सचिन डाकले आदी हजर होते.

Related posts

गृहनिर्माण सोसायट्यांनी स्वत:चे निर्बंध घालू नये-जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Vishal Khandagale

भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा सुरू!

Vishal Khandagale

खंडोबा मंदिर खुले करण्यासाठी जेजुरीत मनसेचे आंदोलन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX