आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

कोरोना : बेड तुटवड्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतेय.

● अशा स्थितीत पुण्यातील प्रमुख रुग्णालयात बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे.

● खासगी रुग्णालयात ८०  टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

● काय आहे महापौर मोहोळ यांचं ट्विट? : ‘कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खासगी दवाखान्यातील 80 टक्के बेड्स कोविड उपचारासाठी उपलब्ध करुन देण्याबाबतचे आदेश आज काढण्यात आले आहेत. 31 मार्चपासून हे बेड्स कोविड रुग्णांना उपलब्ध होतील’, असं ट्वीट मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

Related posts

कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्र्यांचे पत्र

Vishal Khandagale

पुण्याच्या उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाच्या सुनिता वाडेकर यांची निवड

Vishal Khandagale

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 2 हजार दंड

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX