CORONA HELPकोरोनापुणे शहर

खासदार गिरीश बापट यांच्याकडून १ कोटी ६५ लाखाची मदत

पुणे शहर :- कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव मुळे आलेल्या वैश्विक संकटावर मात करण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी १  कोटी ६५  लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत त्यांच्या खासदार निधीतून दिली जाणार असून त्यातून पुणे शहरासाठी ऑक्सिजन काॅन्सट्रेटर्स व रूग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत.खा.बापट यांनी गुरूवारी पत्रकारांना ही माहिती दिली.

पुणे महानगरपालिकेला ऑक्सिजन काॅन्सट्रेटर्स मशीन खरेदी करण्यासाठी बापट यांनी 25 लाख रूपये दिले आहेत. हा निधी उपलब्ध होण्यासाठी बापट यांनी आज जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना पत्र दिले.

तसेच रुग्णवाहिकेची कमतरता पडू नये म्हणून दहा सामाजिक संस्थांना रुग्णवाहिका खरेदी करण्याकरिता एक कोटी चाळीस लाखरुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. टेंडर प्रक्रिया व इतर आवश्यक बाबीची पूर्तता करून रुग्णांना ही मदत उपलब्ध होईल. असेही बापट यांनी सांगितले.

Related posts

पुणे महापालिका खरेदी करणार 25 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन; स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने

Vishal Khandagale

ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या

Vishal Khandagale

कोरोना: महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचे स्वयंसेवी संस्था/सोसायट्यांना मदतीचे आवाहन.

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX