Pune City News
पर्वतीपुणे शहर

कर्नाटक आंब्याची ” देवगड हापूस” नावाने विक्री करणाऱ्यांवर कारवाई

पुणे शहर :- गुलटेकडी मार्केटयार्ड येथे कर्नाटकातून येणारा आंबा हा कोकणातील देवगड हापूस नावाने विक्री करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणातील बाजार समितीचे प्रशासक मधूकांत गरड यांनी बाजारातील तीन आडत्यांवर कारवाई केली आहे.

सध्या आंब्याचा सिजन असल्याने अनेक विक्रेत्यांकडून परराज्यातील विविध जातीचे आंबे ‘कोकण हापूस’ या नावाने विकले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते.

या फसवणुकीस आळा बसण्यासाठी राज्याचे पणन संचालक सतीश सोनी यांनी परिपत्रक काढले आहे. अशा फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचा आदेश सोनी यांनी राज्यातील बाजार समित्यांना दिला आहे.

Related posts

🚨 “वायरसिटी” विमाननगर – इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेलं प्रभाग ३! 🚨

Vishal Khandagale

शहरात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !

Vishal Khandagale

पुणे शहरांत “काय सुरू काय बंद” पहा!

Vishal Khandagale