Pune City News
कोरोनामनोरंजनराष्ट्रीय

चीनकडून जागतिक व्यवसायावर ताबा; जगातील मोठ्या कंपन्यांची खरेदी केली हिस्सेदारी !

Pune City News:- संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडल्यानंतर चीनने जगातील व्यवसाय-उद्योगावर ताबा मिळविण्याच्या कारवाया सुरू केल्याचे समोर आले आहे. चिनी शेअर बाजार सध्या तेजीत असून, चीनच्या काही बलाढ्य कंपन्या जगातील बड्या कंपन्यांची हिस्सेदारी खरेदी करीत आहेत. चीनचे व्यापारी केंद्र असलेल्या ‘वुहान’चा कोरोनामुळे विध्वंस झालेला असतानाही चीनमधील बाजार तेजीत कसे, याचे कोडे जाणकारांना पडले आहे.
चीनची सगळ्यात मोठी कंपनी अलीबाबाने 1.54 टक्के आणि टेनसेंटने 0.39 टक्के नफा एकाच आठवड्यात कमावला आहे. चीनच्या कंपन्या हाँगकाँग शेअर बाजाराचा निर्देशांक ‘हेंग-सेंग’च्या माध्यमातून बाजारात शेअर खरेदी करीत आहेत. या कारणामुळे हेंग-सेंगमध्ये 32 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. ही वाढ मागच्या 1 वर्षातील वाढीच्या दुप्पट आहे.
मागच्या आठवड्यात चीनमधील ‘शांघाय स्टॉक एक्स्चेंज’ आणि ‘शेनझेन’ने मागील 2 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी केली. या शेअर बाजारांत 5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली

चीनवगळता संपूर्ण आशिया खंडातील शेअर बाजारांत 10 टक्क्यांची सरासरी घसरण झाली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे संपूर्ण जगातील शेअर बाजारांत झालेल्या घसरणीचा फायदा चीन घेत आहे. चीन बड्या कंपन्यांचे समभाग कमी किमतीत विकत घेत आहे.

Related posts

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या

Vishal Khandagale

मोदींची घोषणा : रोजगारनिर्मितीसाठी 50 हजार कोटी

Vishal Khandagale

कोरोना टेस्टिंगबाबत आयसीएमआरची नवीन गाईडलाईन

Vishal Khandagale

Leave a Comment