Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

कोरोना संकट पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टर प्लॅन तयार

Pune City News:- लॉक डाऊनच्या काळात मदतीचं मोठं जाळं उभं करण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार झाला आहे. लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाने लॉक डाऊनमुळे बाधित गोर गरीब, मजूर, ज्येष्ठ नागरिक, गरजूंना अन्न-धान्याचा पुरवठा करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. केंद्रीय नेतृत्वाने दिवसाला 51 लाखांचा टार्गेट दिला आहे.

●असा असेल भाजपचा मास्टर प्लॅन●

▪️ निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने केंद्रीय नेतृत्वापासून ते अगदी बूथ स्थरापर्यंत उभारलेलं जाळं या कामासाठी वापरण्यात येणार आहे.

▪️ या उपाययोजना राबवण्यासाठी राज्यात समन्वयाची जबाबदारी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश सचिव संजय उपाध्याय यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

▪️ देशभरातील 1 कोटी कार्यकर्ते 5 कोटी गरीब गरजूंच्या भोजनाची व्यावस्था करतील. यासाठी प्रत्येक कार्यकर्ता किमान 5 जणांची जबाबदारी घेईल.

▪️ राज्यात 51 लाखांचं टार्गेट देण्यात आले आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी घरी अन्न शिजवून वितरण करावे,व्यावसायिक भोजनालयांची मदत घ्यावी किंवा धान्य, डाळी, मीठ, मसाल्याची पाकिटं पुरवावीत.

▪️ फक्त मुंबईतच 10 लाख गरजू लोकांना भोजन पुरवण्याचा प्रयत्न असणार आहे.

▪️ मेड इन इंडिया : भारतीय रेल्वेनं सुरू केलं आयसोलेशन वॉर्ड; रुग्णालयातील सर्व सुविधा मिळणार

●अशी असेल कार्य योजना●

▪️ सर्व खासदार आमदारांच्या घरून एक कार्यकर्ता कंट्रोल रूम चालवली जाईल ज्याचा नंबर त्या परिसरात कळवळा जाईल.

▪️ राज्यातील 700 मंडलचे व्हाट्सएप ग्रुप तयार केले जातील. भोजन पुरवण्याची माहिती या ग्रुपद्वारे मंडल अध्यक्षांना दिली जाईल.

▪️ जिल्हाध्यक्षांनी लोकप्रतिनिधी आणि मंडल अध्यक्षांच्या मध्ये दुवा म्हणून काम करायचे आहे.प्रत्येक जिल्हा स्तरावर आणि महानगरात विधानसभा स्तरावर हेल्पलाईन सुरू केली जाईल.

▪️ दारिद्र्य रेषेखालील लोकांना ज्यादा रेशन देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी प्रत्येक मंडल मध्ये एक कार्यकर्ता

▪️ स्वतंत्रपणे अन्न नागरी पुरवठा अधिकारी, रेशन दुकानदार यांच्या संपर्कात राहून गरजूंपर्यंत शिधा पोचतोय याची खबरदारी घेणार.

▪️ भाजपचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि सभागृह नेते दररोज सर्व उपक्रमाची माहिती, सूचना, अहवाल बावनकुळे यांना पाठवणार. या कामाची दररोज समीक्षा केली जाणार.

Related posts

नायडू रुग्णालयातील ” त्या” 22 जणांच्या मृत्यूची चौकशी करा

Vishal Khandagale

राष्ट्रीय क्रमवारीत डी. वाय.पाटील दंत महाविद्यालयाला तिसरे स्थान…

Vishal Khandagale

Containment Zone मधील रस्ते पूर्ण सील !

Vishal Khandagale

Leave a Comment