Pune City News
पुणेमहाराष्ट्र

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करा… – संभाजी ब्रिगेड

Pune City News :-  राज्यघटना देशासाठी सर्वोच्च असून संविधान धर्मनिरपेक्ष आहे. मात्र दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी भारतीय संविधानावर ‘गणपती’ ची स्थापना केली आहे. हे निषेधार्य आहे. राज्यघटने प्रमाणे (संविधान) भारत देश हा धर्मनिरपेक्ष आहे.

धार्मिक कार्यक्रमात राज्यघटना वापरता येत नाही, कायद्याने सुद्धा ते चुकीचे आहे. असे असताना संविधान हे गणपतीचा पाठ समजून तरडे यांनी भारतीय संविधानाचा वापर केला आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवीण तरडे यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करावा अशी संभाजी ब्रिगेड ने  मागणी केली

Related posts

चित्रपटानंतर आता नाटक सुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्म वर…

Vishal Khandagale

सप्टेंबरमध्ये होणार विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन

Vishal Khandagale

ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करा; महापौर

Vishal Khandagale

Leave a Comment