पुणे

पुणे शहर पोलीस दल कल्याण’ साठी ५० लाख रूपयांचा धनादेश हस्तांतरीत

संपूर्ण जगाला हादरवून टाकणार्‍या कोविड-१९ महारोगाच्या संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता, अविरत कार्य करणार्‍या पोलीस दलाप्रति कृतज्ञता व्यक्त करताना, त्यांना व त्यांच्या कुटूंबीयांसाठी छोटीशी मदत म्हणून पुण्यातील नामवंत उद्योगपती व इंडो शॉट्ले ऑटो पार्ट प्रा.लि.चे अध्यक्ष विजय बी. पुसाळकर यांनी ५० लाख रूपयांचा धनादेश ‘पुणे शहर पोलीस दल कल्याण’साठी आज( सोमवारी) रोजी हस्तांतरीत केला.

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या उपस्थितीत पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. वैंकटेशम् यांच्याकडे हा धनादेश हस्तांतरीत करण्यात आला.

यावेळी विकास काकतकर, कुमार ताम्हाणे, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) मितेश घट्टे, पोलीस आयुक्त – पंकज देशमुख, सुहास बावचे, संभाजी कदम, पोर्णिमा गायकवाड आणि शिरीष सरदेशपांडे आदि मान्यवर अधिकारी उपस्थित होते. कोविड सुरक्षा नियमांचे संपूर्ण पालन करत हा धनादेश हस्तांतरणाचा कार्यक्रम पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडला

Related posts

सूर्यदत्ता’ देणार १०० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Vishal Khandagale

राज्यातील मद्यालयांना रात्री दहापर्यंत परवानगी

Vishal Khandagale

लोहगाव ” Micro Containment Zone ” पहा !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX