Pune City News
पिपरी चिंचवड

‘संभाजी भिडे’ म्हणजे भगवा दहशतवाद; राहुल डंबाळे

भीमा कोरेगाव घटनेतील आरोपी ‘संभाजी भिडे’ हे म्हणजे भगवा दहशतवाद आहेत. त्यांच्यावर २ जानेवारी २०१८ रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात कलम ३०७ व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परंतु आजपर्यंत त्यांना व त्यांच्या इतर साथीदारांना अटक झाली नाही. तसेच या प्रकरणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले इतर गुन्हे मागे घेण्याबाबत शासन निर्णयानुसार त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे महाराष्ट्र पक्षनेता राहुल डंबाळे यांनी केली.

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीतील आरोपी असणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक करावी, या मागणीसाठी ॲट्रॉसिटी जनजागरण परिषदेच्यावतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सोमवारी (दि.१४ सप्टेंबर) सत्याग्रह आंदोलन रिपब्लिकन युवा मोर्चाचे महाराष्ट्र पक्षनेता राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, सुवर्णा डंबाळे, कष्टकरी कामगार पंचायतीचे बाबा कांबळे तसेच रवी सावळे, प्रमोद क्षिरसागर, सचिन वाघमारे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आपले निवेदन दिले.

Related posts

मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत

Vishal Khandagale

कोरोना: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील तपासणी अहवाल

Vishal Khandagale

कोरोना : हॉस्पिटलमध्ये खाटा राखून ठेवा; केंद्र सरकारचे आदेश

Vishal Khandagale

Leave a Comment