Pune City News
आरोग्यकोरोनापुणे शहर

पुणे शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकानेही बंद!

पुणे शहरांत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने नवे नियम जारी केले आहेत. शहरांत  अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींना कोरोना चाचणी करण्यातून सूट देण्यात आली आहे. तसे आदेश पुणे महापालिका आयुक्तांनी काढले आहेत.

  •  मेस, मद्यविक्री आणि चष्म्याच्या दुकानांना अटींसह परवानगी देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना आता कोरोना चाचणीचे बंधन नसेल. पुण्यात खानावळींना पार्सल सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे.
  • मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, फक्त होम डिलिव्हरी करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे

वाढती कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहता वीकेंड लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानं बंद राहतील, अशी माहिती पुण्याचे सह. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. पुण्यात आता शनिवार आणि रविवारी फक्त मेडिकलची दुकान सुरु ठेवण्यास परवानगी आहे.डॉ. रवींद्र शिसवे यांनी वीकेंड लॉकडाऊनबाबत एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत करताना जे लोक संचारबंदीचे नियम मोडतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. पुणे पोलिसांच्या इशाऱ्याचा पुणेकर नागरिकांकवर किती परिणाम होतो, हे पाहावे लागणार आहे.

आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केलेले सुधारित आदेश :- 

1. सर्व ऑक्सिजन प्रोडयूसर कंपन्यांनी 100 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा हा फक्त वैद्यकीय कारणासाठी करावा. त्यांनी ऑक्सिजनचा वापर करणारे आणि ऑक्सिजन पुरवठा करणारे यांची यादी प्रसिध्द करावी.

2. पुणे मनपा क्षेत्रात मे. महाराष्ट्र शासनाने ज्या अत्यावश्यक सेवेशी संबंधित उत्पादन करणार्‍या कंपन्यांना परवानगी दिलेली आहे अशा कंपन्यांना आवश्यक मालाचा पुरवठा करणारी दुकाने केवळ त्याच कारणासाठी सुरू ठेवता येतील. त्यांना इतर किरकोळ विक्री करता येणारर नाही. त्यांनी पॉईंट टू पॉईंट विक्री करावी.

3. खाली आस्थापनावरील कर्मचार्‍यांना कोविड-19 (आरटीपीसीआर / आरएटी / ट्रूनॅट / सीबीएनएएटी) चाचणी करण्यापासून सूट देण्यात येत आहे.

3.1- ई-कॉमर्स मार्फत घरपोच सुविधा देणारे कर्मचारी

3.2-  हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांचे कर्मचारी तसेच त्यांचे मार्फत घरपोच सुविधा देणारे कर्मचारी

3.4-  खाजगी वाहतूक करणारे वाहन चालक / मालक

3.5-  दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालीन मासिके, साप्ताहिके इत्यादीची छपाई व वितरण करणारे कर्मचारीइ.घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणार्‍या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस / नर्स

3.6-  तथापी, त्यांनी भारत सरकारव्दारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

Related posts

सुवर्णयुग मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने आंबेडकर जयंती निमीत्त जीवनावश्यक वस्तू चे वाटप!

Vishal Khandagale

आमदार सुनिल टिंगरें कडून ५० लाखांचा निधी !

Vishal Khandagale

पुणे शहरात 101 मोफत रुग्णवाहिका उपलब्ध !

Vishal Khandagale

Leave a Comment