Pune City News
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

ससूनचे डॉक्टर आज रात्रीपासून संपावर जाण्याच्या तयारीत ; “या” आहे प्रमुख मागण्या !

पुणे शहरात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव सुरु असताना ससून रुग्णालयातील (Pune Sassoon hospital) निवासी डॉक्टर आज रात्रीपासून संपावर जाणार आहेत. विविध मागण्यांसाठी डॉक्टरांनी (Doctors Strike) संपाचं हत्यार उपसलं आहे. तातडीने बेड उपलब्ध करुन मनुष्यबळ वाढवा ही या डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे.

  1. मनुष्यबळाशिवाय बेड वाढवल्यामुळे रुग्णांवरील उपचाराचं व्यवस्थापन कोलमडून जाईल.
  2. बेड तर तयार करण्यात येतील पण त्यासाठी आवश्यक असणार मनुष्यबळ, resources प्रशासनाकडे आहेत का?
  3. दुसऱ्या लाटेची कल्पना डिसेंबर 2020 लाच आली असताना शासनाकडून कोणतीही पूर्वतयारी केली गेली नाही
  4. Covid duty करणारे डॉक्टर्सला quarantine ,isolation ची सुविधा नाही त्यामुळे आमचे 80 निवासी डॉक्टर्स एका महिन्यात Covid ने infect झाले.
  5. आम्ही दीड महिन्यापासून प्रशासनाला यावर आवश्यक उपाययोजना साठी विनंती करत असून त्या वर कोणतेही उपाय केले गेले नाहीत

दरम्यान, ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड होत असल्याचा आरोप आहे. एका बेडवर 2 ते 3 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ससूनमध्ये बेडची कमतरता आहे. नवीन इमारतीत बेड उपलब्ध असूनही तिथल्या बेडचा वापर केला जात नाही.

शहरांत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, पुण्यातील रुग्णालयात बेड्सची मोठी कमतरता भासत आहे. अशावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयात अजून 300 बेड कोविड रुग्णांसाठी वाढवण्यात येणार आहेत.

त्यामुळे आता ससूनमधील कोरोना रुग्णांसाठीच्या बेड्सची संख्या 500 वरुन 800 वर पोहोचली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Related posts

पुणे शहरात होळी व धूलिवंदनविषयी मोठा निर्णय!

Vishal Khandagale

पुणे शहर भाजपचे ५२५० रक्त पिशव्यांचे संकलन

पुणे शहरात विक्रमी ६२२५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Vishal Khandagale

Leave a Comment