Pune City News
गुन्हे विषयकपुणे

पोलिसाने दारूच्या नशेत पाच जणांना उडवले; एकाचा मृत्यू

crime

पुण्यात एका सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाने दारूच्या नशेत स्वतः भरधाव कार चालवत पाच जणांना उडवले आहे.

बालेवाडी परिसरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी( दि.६) रोजी हा प्रकार घडला आहे. या धडकेत एक जण जागीच ठार झाला असून बाकीचे गंभीर जखमी झाले आहेत.

संतोष राठोड (वय ३५) असे मृत्युमूखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राजेश सिंग आणि आनंद भांडवलकर अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी चालक संजय निकम यांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय निकम हे रविवारी( दि.६) रोजी दुपारच्या सुमारास बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरातून चार चाकी वाहनातून जात होते. दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या निकम यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार दुचाकीला जाऊन धडकली.

तसेच दुचाकीवरील एक व्यक्ती खाली पडली तर दुसरी व्यक्ती दुचाकीवर अडकली आणि ती व्यक्ती कारबरोबर जवळपास १०० मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली.

त्यानंतर ही भरधाव कार बालेवाडीतील ममता चौकातील रस्त्यालगत असणार्‍या एका पंक्चरच्या दुकानात शिरली. त्यामुळे दुकानात असणाऱ्या तिघांना कारने उडवले.

त्यानंतर जवळच असणार्‍या एका टेम्पोला धडक देऊन कार थांबली. या अपघातात दुचाकीवरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी नागरिकांनी कारचालक संजय निकम यांना ताब्यात घेऊन जबर चोप दिला. व पोलिसांच्या ताब्यात दिले. अधिक तपास सुरू आहे.

Related posts

अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद

Vishal Khandagale

कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्‍णांचे समुपदेशन करुन त्‍यांना घरी पाठविण्‍यात यावे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Vishal Khandagale

पुणे शहरात एकाच दिवशी उच्चांकी ३९९ नवीन कोरोनाग्रस्थ

Vishal Khandagale

Leave a Comment