महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे.

▪️ मराठा समाजाला एसईबीसीतून आरक्षण देण्याबाबतचा अडसर दूर करण्यासाठी केंद्र सरकारने संविधानात यथोचित सुधारणा करून आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्याबाबतचा केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव विधानसभा व विधान परिषदेत मंजूर करण्यात आला आहे.

▪️ तर एसईबीसी आरक्षणाबाबतच्या न्यायालयीन लढ्यामुळे रखडलेल्या नोकरभरती प्रक्रियेतील एसईबीसी उमेदवारांना वयाच्या ४३ वर्षांपर्यंतची सवलत तसेच परीक्षा शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

▪️ तसेच २०१४ च्या ईएसबीसी कायद्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे ११-११ महिन्यांच्या नियुक्त्या देण्यात आलेल्या उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

▪️ त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यापूर्वी २०१४ च्या ईएसबीसी कायद्यांतर्गत झालेल्या सर्व नियुक्त्या कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related posts

राज्यात कोरोनाच्या ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Vishal Khandagale

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढला..भारतासाठी पुढील 30 दिवस महत्त्वाचे !

Vishal Khandagale

सरकारच्या उपाययोजनांची घोषणा कागदावरच…

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX