पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

‘शिवसेनेला फसवले ही चूक झाली’ – मुनगंटीवार

विधानसभा निवडणुकी अघोदर शिवसेना-भाजपमध्ये आम्ही जे ठरविले होते, त्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी दिलेला शब्दच न पाळल्यामुळे आमच्या चुकीचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला, असा घरचा आहेर भाजपचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वपक्षीय नेत्यांना दिला.
आम्ही शब्द पाळला असता, तर आज शिवसेनेसोबत आमची सत्ता असती.
आम्ही त्यांना फसवले, आमची चूक झाली. आमच्या चुकीचा फायदा तुम्हाला झाला. पण एक ना एक दिवस ती चूक आम्ही सुधारू असेही ते म्हणाले.
मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जे ठरले तो शब्दच आमच्या पक्षाच्या नेत्यांनी फिरविल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तुमची तीन महिन्यांची मैत्री आहे, तर आमची मैत्री 30 वर्षांपासूनची जुनी आहे, हे विसरू नका, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.

Related posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैलजोडी लोकार्पण

Vishal Khandagale

पुणे शहारातील चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत “कर्फ्यू” कडक

Vishal Khandagale

पुणे विद्यापीठाकडून शुल्कवाढीच्या निर्णयाला एक वर्ष स्थगिती !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX