मराठा आरक्षणासाठी राज्याच्या विविध भागात मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करणार आहे. कोल्हापुरमध्ये मराठा आंदोलक मुंबई आणि पुण्याला येणारा दूध पुरवठा रोखणार आहेत.
तर पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्यात आले आहे. औरंगाबादेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे.
- औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चा आज ढोल बजाव आंदोलन करणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातही मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. पुण्या-मुंबईकडे जाणारा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
- गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव कार्यालयाबाहेर टॅंकर अडवणार आहेत. गोकुळमधून रोज पुण्यासाठी 15 टँकर, तर मुंबईसाठी 35 टँकर दूधपुरवठा होतो. हा सर्व दूध पुरवठा रोखण्याचा प्रयत्न आंदोलक करणार आहेत.
- जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

