Pune City News
पुणे

बाणेर डेडीकेटेड कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेने होणार कार्यान्वित

पुणे महापालिकेने साकारलेले बाणेर डेडीकेटेड कोविड रुग्णालया आपण सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरु करत असून ३१४ बेड्स उपलब्ध होत आहेत, ज्यात २७२ ऑक्सिजन तर ४२ आयसीयू बेड्स असणार आहेत.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या कोविड सेंटरला भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बाणेर कोविड सेंटरसाठी २६ व्हेंटिलेटर उपलब्ध झाले असून त्यापैकी १५ कार्यान्वित आहेत, तर येत्या दोन दिवसांत आणखी एक व्हेंटिलेटर उपलब्ध होईल.

आपल्या पुणे महापालिकेच्या ०२०-२५५००२११० या क्रमांकावर नोंदणी केले जाणाऱ्या रुग्णांना या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले जात आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी ५६ डॉक्टर्स, ५७ नर्स आणि ५१ मदतनीस उपलब्ध आहेत.

आजपर्यंत या रुग्णालयात १०५ रुग्ण दाखल झाले असून सद्यस्थितीत ८ रुग्ण आयसीयूमध्ये तर ७० रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

यावेळी आयुक्त विक्रम कुमार, नगसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, गणेश कळमकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, उपायुक्त नितीन उदास, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्यासह सेंटरचे डॉक्टर्स आणि महापालिकेचे विविध अधिकारी उपस्थित होते.

Related posts

सूर्यदत्ता’ देणार १०० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Vishal Khandagale

पिंपरी चिंचवड शहराचा केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यात सातवा क्रमांक

Vishal Khandagale

‘इन्सिडंट कमांडर’ म्हणून तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील

Vishal Khandagale

Leave a Comment