पुणे शहर

राज्य शासनाच्या क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समिती अध्यक्षपदी विजय डाकले

पुणे शहर :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ व्या जयंती वर्षानिमित्त संगमवाडी येथील लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारकाचे बांधकाम व इतर अनुषंगिक बाबी सनियंत्रित करण्याकरिता क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी विजय डाकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विजय डाकले यांनी आभार मानले आहेत. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णयानुसार  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.  त्यामध्ये संगमवाडी, जि. पुणे येथील लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक विकसित करण्याच्या कामाचा समावेश करण्यात आलेला आहे.

यानुसार संगमवाडी येथील लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारकाचे बांधकाम व इतर अनुषंगिक बाबी सनियंत्रित करण्यासाठी विभागाच्या अशासकीय सदस्यांसह सुधारीत समिती गठीत करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार समितीच्या अध्यक्ष पदी विजय डाकले यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच सदस्यपदी राजू धडे, निलेश वाघमारे, शांतीलाल मिसाळ, रवि पाटोळे, बाळासाहेब भांडे यांची निवड करण्यात आली असून शासकीय सदस्य म्हणून विभागीय आयुक्त पुणे, पुणे महानगरपालिका आयुक्त, समाजकल्याण आयुक्त पुणे, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असणार आहेत.

 

Related posts

पुणे-लोहगाव विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द

Vishal Khandagale

तारकेश्वर टेकडीवर पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उपाध्यक्ष अक्षता राजगुरु वतीने वृक्षारोपण

Vishal Khandagale

पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी समूह विकास, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.