Pune City News
पुणे शहरवडगावशेरी

पुणे-लोहगाव विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द

पुणे शहर – लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असल्याने २६ एप्रिल ते ९ मेपर्यंत लोहगाव विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे सध्याच्या काळातही विमानतळावरून वाहतूक सुरू राहणार आहे.

विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम होणार असल्यामुळे विमानतळ १४ दिवस बंद करण्याचा निर्णय या पूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार विमान वाहतूक कंपन्यांनी या कालावधीतील आरक्षणे देखील घेतली नव्हती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द झाल्याची माहिती प्रशासनाने विमान वाहतूक कंपन्यांना कळविली होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांना प्रवासी उपलब्ध झाले नाहीत. तसेच प्रवासी अत्यल्प असल्यामुळेही विमाने सोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

Related posts

COEP वसतिगृहात ८० बेड्सचे वैद्यकीय निरीक्षण केंद्र !

Vishal Khandagale

पीएमपीएमएलची अभि-एअरपोर्ट बससेवा आता नियमित तिकीटदरात

Vishal Khandagale

गुढीपाडव्याला दुरूनच ‘दगडूशेठ गणपतीचे’ दर्शन

Vishal Khandagale

Leave a Comment