शनिवार वाड्याच्या २८९ व्या वर्धापन दिनानिमित्त थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान तर्फे विविध कार्यक्रमांनी पार पडला. यावेळी शनिवारवाड्यातील दिल्ली दरवाजाही उघडण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात थोरले बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली.
यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवे आणि कुटुंबीय, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, मुकुंद काळे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, ब्राह्मण महासंघाचे मकरंद माणकीकर आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ मोहन शेटे यांनी शनिवारवाड्याच्या गौरवशाली इतिहासाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

