Pune City News
पुणे शहर

‘श्रीमंत दगडूशेठ गणपती’ मंदिरात कोरोना संकट निवारणासाठी विशेष यज्ञ

पुणे शहर :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे कोरोना संकट निवारणासाठी विशेष यागाचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी, मृत्युंजय व धन्वंतरी महायाग पार पडला.

कोरोनाचे वैश्विक संकट दूर व्हावे याकरिता मंदिरामध्ये या विविध यागाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ मे २०२१ बुधवार, उग्रनरसिंह व सुदर्शन महायाग होणार आहेत.

वेदमूर्ती नटराज शास्त्री व ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत हे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. हे सर्व धार्मिक कार्यक्रम ट्रस्टच्या यू ट्यूब, फेसबुक, वेबसाइट व सोशल माध्यमांवरून भाविकांना घरबसल्या पाहता येणार आहेत.

Related posts

ससूनचे किमान ६० टक्के बेड्स तरी कोविडसाठी राखीव ठेवा-महापौर

Vishal Khandagale

राहुल शिरसाठ यांच्या वतीने घरकाम करणाऱ्या महिलांना राशन कीट वाटप !

Vishal Khandagale

कोरोना कॉल सेंटर आता २४ तास : महापौर मोहोळ

Vishal Khandagale