Pune City News
गुन्हे विषयकपुणे शहर

छोटा राजन च्या पुतणीला 50 लाखांची खंडणी मागीतल्या प्रकरणी अटक !

पुणे शहर :- अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची पुतणी असल्याचं सांगून तरुणीने पुण्यातील एका व्यक्तीला 50 लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी एका आरोपीला यापूर्वी अटक केल्यानंतर पोलिसांनी आता संबंधित तरुणीला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी प्रियदर्शनी निकाळजे हिने मार्च 2020 मध्ये एका व्यक्तीला 50 लाख रुपयाची खंडणी मागितील होती. आपण एका राजकीय पक्षाची जिल्हाध्यक्ष आहोत. तसंच छोटा राजनची पुतणी असून आमचा डीएनएही एक आहे. तुला जीव प्यारा असेल तर 50 लाख रुपये दे, अशी धमकी निकाळजेने दिली होती. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून 25 लाखाची खंडणी स्वीकारताना धीरज साबळे याला रंगेहात पकडलं होतं. मात्र, मुख्य आरोपी प्रियदर्शनी निकाळजे मात्र फरार होती.

 

Related posts

कर्नाटक आंब्याची ” देवगड हापूस” नावाने विक्री करणाऱ्यांवर कारवाई

Vishal Khandagale

पुणे शहर युवक कॉग्रेसचे “अन्नछत्र” होणार सुरु !

Vishal Khandagale

हडपसरमध्ये पुन्हा सराईताचा खून !

Vishal Khandagale