Uncategorized

संपूर्ण शहर आता ‘लेफ्ट वे फ्री’

आता  संपूर्ण शहर आता ‘लेफ्ट वे फ्री’ केल्यानंतर वळणावरील वाहतूक नियंत्रण  सिग्नल आवश्यकता भासणार नाही. तसेच शहरातील चाैक वाहतूक काेंडी कमी हाेण्यास मदत हाेईल.

याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव आणि शिवसेनेचे नगरसेवक अविनाश साळवे यांनी शहर सुधारणा समितीसमाेर ठेवला हाेता. त्यास शहर सुधारणा समितीने मंजुरी दिली असून, मुख्यसभेने मंजुरी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ताे वाहतूक पोलिसांकडे पाठविण्यात येईल.

शहर सुधार समितीचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, दिल्ली, चंदीगड, बेंगळुरु इत्यादी मोठ्या शहरांमध्ये, प्रत्येक चौकात डावीकडे थेट वळण्यास परवानगी आहे. यामुळे त्या शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. तेथे वाहने कोणत्याही चौकात  कोणत्याही अडथळ्याशिवाय डाव्या बाजुने सोडली जातात. असा प्रयोग पुणे शहरात होणे आवश्यक आहे. असे प्रस्तावात नमूद केले आहे.

शहरातील अनेक चौकांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि वाहतूकीची कोंडी निर्माण होते. या चाैकात सिग्नल असल्याने डावीकडे वळणारी वाहने देखील चाैकातील रस्त्यावर थांबून राहतात. यामुळे चाैकातील वाहनांची संख्या वाढत जाते.

पुणे शहरातील अनेक चाैकांतील रस्ते अरुंद आहेत. त्याचाही परीणाम हाेत असताे. ही वाहतूक काेंडी कमी करण्यासाठी डावीकडे वळण्यासाठी चाैकात थांबून राहीलेल्या वाहनांना थेट वळण्यास परवानगी दिली तर तेथील वाहतूक काेंडी 33 टक्क्याने कमी हाेऊ शकते. प्रत्येक चाैकातील वाहतूक व्यवस्था, उपलब्ध जागा आणि नकाशा याचाही विचार करण्यासंदर्भातही समितीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. यावर वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांनुसार अंमलबजावणी करतात हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.

Related posts

शिक्रापूर येथे ४१लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

Vishal Khandagale

सखोल परीक्षण करून रुग्णांचा दर शून्यावर आणावा; कुणाल कुमार

Vishal Khandagale

संचारबंदी व जमावबंदीचे उल्लंघन करणार्‍यांना 1000 रुपये दंड

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX