Pune City News
पुणे

9 हजार कोटी द्या; मग गावे समाविष्ट करा : महापौर

मुख्य सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना महापौर मोहोळ यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, महापालिकेच्या हद्दीत ज्या 11 गावांचा समावेश झाला, त्याठिकाणी रस्ते, पाणी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांची वानवा आहे. आजही टँकरने पिण्याचे पाणी पुरवठा सुरू आहे. रस्त्यांची दुरावस्था आहे.

आता नव्याने 23 गावांचा समावेश सरसकट न करता टप्प्याटप्प्याने करावे. परंतु, 2017 मध्ये 11 गावांचा विकास आराखडा तयार करून पायाभूत विकास करण्यासाठी 9 हजार कोटी रुपये निधी द्यावा. कारण पायाभूत सुविधांवर ताण येत आहे, तो कसा कमी करणार आहोत.

या सुविधा पुरविताना महापालिकेवर आर्थिक ताण येत आहे. राज्यसरकारने गावे समाविष्ट करताना निधी देखील द्यावा, अशी आमची आग्रही भुमिका असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

Related posts

वारजेत ४५ मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे शरद पवारसाहेबांच्या हस्ते अनावरण

Vishal Khandagale

सरकारने फी संदर्भात अध्यादेश काढावा; बालगंधर्व चौकात पालकांचे साखळी आंदोलन

Vishal Khandagale

पुणे,मुंबई वगळता इतर भागात एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी !

Leave a Comment