PUNE CITY NEWS:- राजकारण करण्याची वेळ नसून राजकारण थांबवावे तसेच जेव्हा समस्या संपेल, तेव्हा जेवढा जेवढा जोर असेल तसे प्रयत्न करा असे स्पष्ट मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
गडकरी म्हणाले :
▪️ सध्या देशातील गरीब, मजूर, शेतकरी अत्यंत दुःखी असून अशावेळी, सर्व राजकीय पक्ष, नेत्यांनी एकत्रित येऊन या सर्वांना कशापद्धतीने खूश करता येईल.
▪️ या सर्वांच्या समस्यां कशा सोडवता येतील आणि परिस्थितीतून मार्ग कसा निघेल, यासाठी काम करायला हवे.
▪️ मी जास्तवेळ दिल्लीतच असतो. त्यामुळे महाराष्ट्रात माझे फारसे जाणे नाही. सध्या माझे संपूर्ण लक्ष कोरोना संकटावर आहे.
▪️ पंतप्रधानांनी मझ्यावर काही जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. केवळ त्यांच्याच संपर्कात मी असतो. बाकी राजकारणासंदर्भात मला माहीत नाही.
पंतप्रधान मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले असून या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीने केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्याशी संवाद साधला.
दरम्यान, महाराष्ट्रातील सरकार नियमाने चालत आहे का ? का त्याचीही पावती फाटण्याची वेळ आली आहे असे वाटते का ? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी असे स्पष्टीकरण दिले आहे.

