पुण्यात कोरोना चा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्याच प्रमणे सोशल मीडियावर खोटे मेसेज देखील पसरत आहेत. कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय हे मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड केले जात आहेत. असाच एक मेसेज पुण्यातील कमांड हॉस्पिटलबाबत व्हायरल होत आहे. यामध्ये कमांड हॉस्पिटलमध्ये 5000 कोविड बेड उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. दरम्यान हा मेसेज खोटा असल्याचे लष्कराच्या जनसंपर्क विभागाने म्हंटले आहे.
Dear Citizens, We would like to keep you safe from mis-information being spread on social media. Message regarding 5000 beds Army Hospital in Pune is FAKE. pic.twitter.com/7H6wDk0wo0
— PRO Defence Pune (@pune_pro) May 4, 2021
सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे त्याबाबत नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन लष्कराच्या जनसंपर्क विभागाने केलं आहे.

