Pune City News
पुणे

काँग्रेस गटनेतेपदी नगरसेवक बागुल यांची निवड

PUNE CITY NEWS :- पुणे महापालिकेच्या काँग्रेस गटनेतेपदी जेष्ठ नगरसेवक आबा बागुल यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यासंबंधीचे पत्र दिले आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली.

मावळते काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी तब्बल 7 वर्षे या पदावर काम केले आहे. या कालावधीत त्यांनी भाजपवर जोरदार दबाव निर्माण केला होता.

सभागृहात अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. तर, बागुल हे सुद्धा तब्बल 30 वर्षांपासून नगरसेवक आहेत. त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेता, उपमहापौर या पदांवर काम पहिले आहे.

Related posts

पुण्यातील उद्योजका कडून ससूनला प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट…!

Vishal Khandagale

महापालिका करणार खासगी प्रयोगशाळांसोबत करार

Vishal Khandagale

बेड्सचे नियंत्रण एकाच छत्राखाली आणा – महापौर मोहोळ

Vishal Khandagale

Leave a Comment