Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

नागरिकांनी मास्कचा वापर करावा :  डॉ. म्हैसेकर

PUNE CITY NEWS : कोरोनाच्या विषाणूच्या लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून रुग्ण तपासणी मोहिम हाती घेतल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते आहे.

तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी नेहमी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

ऑनलाईन पत्रकार परिषदेद्वारे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे आयुक्त शेखर गायकवाड, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज (सोमवारी) पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले:

▪️कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी मास्क लावणे, परिसर निर्जंतुकीकरण करणे, सॅनिटायझरचा वापरणे, साबणाने हात धुणे, वयोवृदध व्यक्ती, लहान मुले, गरोदर स्त्रिया यांची विशेष काळजी घेणे.

▪️तसेच शारिरीक अंतर राखणे, अनावश्यक गर्दी टाळणे, इत्यादीबाबींवर जनजागृती करुन सोसायटीमध्ये अशा उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले.

Related posts

पुणे शहरात एकाच दिवशी उच्चांकी ३९९ नवीन कोरोनाग्रस्थ

Vishal Khandagale

देशातील प्रवासी रेल्वे सेवा बंद !

Vishal Khandagale

व्हाइट हाऊसमध्ये कोरोनाचा रुग्ण!

Vishal Khandagale

Leave a Comment