Pune City News
पुणे

जुलै अखेर 18 हजार कोरोनाचे रुग्ण असतील : महापालिका आयुक्त

PUNE CITY NEWS :- पुणे  शहरात 100 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तर, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 61 जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 41 जणांवर उपचार सुरू आहेत. शहरात सध्या कोरोनाचे 12 हजार 474 रुग्ण झाले आहेत.

शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुणे महापालिकेचे नियोजन सुरू आहे. कोरोना रोगामुळे आतापर्यंत शहरात 510 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 7 हजार 435 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.

यापुढील काळात ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत. अशा रुग्णांवर घरीच उपचार घ्यावेत, असा निर्णय घेतला आहे.

ज्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसत आहेत. त्यांच्यावर उपचार करणे शक्य होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मागील आठवड्यात शहरातील खासगी 16 रुग्णालये ताब्यात घेतली आहेत. आता पुढील आठवड्यात देखील आणखी काही रुग्णालये ताब्यात घेण्यात येणार आहेत.

रविवारी तब्बल 620 कोरोनाचे रुग्ण नव्याने आढळले. तर, कोरोनाच्या आजरातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे कोरोना झाला म्हणून काहीही घाबरण्याची गरज नाही. वेळीच उपचार आणि काळजी घेतल्यास हा आजार सुद्धा बरा होऊ शकतो.

Related posts

उद्यापासून कोरोना लसीकरणाला सुरुवात

Vishal Khandagale

पुणे जिल्ह्यात ३३ हजार ६९१ अक्टिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

कोविड-१९ – नमुना तपासणीची क्षमता वाढवावी !

Vishal Khandagale

Leave a Comment