केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी JEE आणि NEET परीक्षेच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले.
रमेश पोखरियाल यांनी सोशल मीडियावर एका लाईव्ह कार्यक्रमात ही माहिती दिली. आगामी काळात कोणतीही परीक्षा रद्द होणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर संवाद साधताना पोखरियाल यांनी CBSE आणि JEE, NEET परीक्षाविषयी विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
रमेश पोखरियाल यांच्या लाईव्ह सेशनमध्ये प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पोखरियाल यांना विविध प्रश्न विचारले.
शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना JEE आणि NEET परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
पोखरियाल यांनी NEET परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा विचार असल्याचे सांगितले. सीबीएसईने अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

