कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-मध्यप्रदेशची सीमा सील करण्याचा मोठा निर्णय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतला आहे.
▪️ यावेळी मुख्यमंत्री चौहान म्हणाले, आमच्या शेजारी राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती भयावह आहे.
▪️ महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्ये स्थिती संकटजनक असून आम्ही महाराष्ट्राची सीमा सील केली आहे.
▪️ महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर त्यांनी केवळ मालवाहतूक, अत्यावश्यक सेवा आणि आपात्कालिन सेवांसाठी मंजुरी दिली आहे.
▪️ दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनाची स्थिती जाणून घेण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन केलं आहे.

