Pune City News
राष्ट्रीय

कोरोनामुक्तीसाठी केंद्राचा व्यापक अँक्शन प्लॅन !

AMIT SHAH

PUNE CITY NEWS :- दिल्लीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,                                             उपराज्यपाल बैजल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत दिल्लीत कोरोनावर नियत्रंण मिळवण्यासाठी 500 रेल्वे कोचचे 8000 बेड देणार                                                    असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे.

तसेच दोन दिवसांत कोरोनाची चाचणी दोनपटीने वाढविण्यात येणार असून 6 दिवसांनंतर ही चाचणी तीन पटीने केली जाणार आहे.

दिल्लीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेन्मेंट झोनमधील प्रत्येक मतदान केंद्रावर कोरोना विषाणू चाचणी सुरू केली जाणार आहे.

तसेच संसर्ग झालेल्यांचा शोध घेण्यासाठी हॉटस्पॉट भागांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे.

दरम्यान, छोट्या रुग्णालयांना कोरोनाबद्दल माहिती, सूचना देण्यासाठी एम्स रुग्णालयात टेलीफोनिक मार्गदर्शनासाठी                                                                                     ज्येष्ठ डॉक्टरांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related posts

रात्री UPI अ‍ॅपचा वापर टाळा; NPCI चे आवाहन

Vishal Khandagale

जगभरात‌ ‘एवढे’ रुग्ण; 30 हजारांवर मृत्यू

Vishal Khandagale

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

Vishal Khandagale

Leave a Comment