Pune City News:- कोरना विषाणू ग्रस्त नागरीकांच्या लागणा-या औषधी व जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यासाठी, विमननगर प्रभाग 3 च्या नगरसेविका श्वेता गलांड़े- खोसे यानी “मी-माझे तीन महिन्याचे वेतन द्यावे” ईमेल व्दारे आयुक्त कार्यलया ला कळविले. तसेच इतर नगरसेवकांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन नगरसेविका श्र्वेता खोसे गलांडे यांनी केले आहे.
जगाला कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे. या कोरानाच्या विळख्यात पुणे शहर येत आहे. पालिकेच्या वतीने कोरोना विषाणु ग्रस्तासाठी विविध प्रकारच्या उत्कृष्ठ उपाययोजना राबिविल्या जातायेत. भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. यामुळे नागरीकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा आणि जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. या संकटाच्या काळात आपत्ती निवारण्यासाठी मी माझे नगरसेवकाचे वेतन महापौर निधी मध्ये जमा करण्यासाठी आयुक्त कार्यालयाल कळविले आहे. अशी माहिती नगरसेविका श्र्वेता गलांडे यांनी दिली.
तसेच नागरीकांना मदतीची गरज आहे. अनेकांचे हातावर पोट आहे. नागरीकांना मदतीची गरज आहे. सामाजीकी बांधिलकी म्हणून मी माझे तीन महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला.

