Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

कोरोना: राज्यात रुग्णांत वाढ !

Pune City News :- राज्यात आज आणखी दहा करोना रुग्ण आढळले असून त्यातील सहा रुग्ण मुंबईचे असून चार जण पुण्यातील आहेत. राज्यात कोरोनाची संख्या 64 वरून 74 वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक विडिओ व्हायरल करून दिली आहे.

या दहा कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी पाच रुग्ण हे परदेशातून आलेले असून इतर पाच रुग्णांना संपर्कामुळे करोनाची लागण झालेली आहे.

पुण्यात चार पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रुग्ण महिलेच्या बहिणीचा पती, तिची बहीण, तिचा मुलगा आणि बहिणीची मुलगी अशा चार जणांचा समावेश आहे.

रुग्ण महिलेच्या पती आणि त्यांच्या मुलीला तापाची लक्षणे असून त्यांना खासगी रुग्णालयातून आता नायडू रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

आरोग्य मंत्री यांनी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे असल्याने नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Related posts

राज्यातील बँका 10 ते 2 सुरू राहणार !

Vishal Khandagale

श्रमिक चळवळीचा आधारवड कोसळला: डॉ. बाबा आढाव यांचे निधन

Vishal Khandagale

कोरोनाबाधितांच्या संपर्कात शहरातील 337 जण !

Vishal Khandagale

Leave a Comment