कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नफेखोरीसाठी बाजारात अप्रमाणित सॅनिटायझर्सची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट -5 ने केलेल्या कारवाईत सहा उत्पादक व विक्रेत्यांना अटक केली आहे.
सुमारे 27 लाख रुपये किंमतीची अप्रमाणित सॅनिटाझर्स जप्त करण्यात आली. मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या सहा आरोपींना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
कोणत्याही प्रकारचा उत्पादनाचा परवाना नसताना हे आरोपी सॅनिटायझर्स बनवून त्यावर ‘मेड इन नेपाळ’, ‘मेड इन तैवान’ अशी लेबल लावून त्याची सर्रास विक्री करीत होती. गुन्हे शाखेच्या अधिकारी पुढील तपास करीत आहे.
previous post
next post

