कोरोनापिपरी चिंचवड

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघातर्फे कोविड योद्ध्यांचा सन्मान

PUNE CITY NEWS :- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने ५० डॉक्टर्स कोविड योद्ध्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी राजेश्वर जंजाळे (एस.पी. कस्टम) यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील डॉ. अजित पाटील, डॉ. सारिका भोईर, डॉ. पद्मनाभ केसकर यांसह 50 डॉक्टर्स कोविड योद्ध्यांचा समावेश होता.

कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर्स दिवसरात्र कशाचीही पर्वा न करता लढा देत आहेत. स्वतःची व आपल्या कुटुंबीयांची पर्वा न करता या रोगाची लागण झालेल्या रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करत आहेत. या लढ्यात बर्‍याच डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. ते बरे होऊन पुन्हा आपले कर्तव्य पार पाडत आहेत, काहींनी तर यात आपले प्राण देखील गमावले आहेत.

कार्यक्रमात निमाचे अध्यक्ष डॉ. सत्यजित पाटील यांनी सर्व डॉक्टरांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष  रविराज साबळे, प्रदेश उपाध्यक्ष शरद शेट्टी, डॉक्टर्स सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. महेश शेटे, प्रदेश सदस्य विशाल डांगे, तुषार कापरे, डॉ. वैदेही जंजाळे, डॉ. सलील पाटील आदी उपस्थित होते.

Related posts

कोरोना : भाजपा चे सर्व नगरसेवक एक महिन्याचे मानधन कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देणार!

Vishal Khandagale

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

Vishal Khandagale

पुणे शहरात आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पहा !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX