कोरोनापुणे

कोविड-१९ – नमुना तपासणीची क्षमता वाढवावी !

Pune City News:- पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांनी कोविड-१९ च्या सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली.

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजनाबाबत डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि खासगी प्रयोगशाळा प्रमुख व समन्वयकांसोबत आढावा बैठक विभगीय आयुक्त कार्यलया मध्ये घेण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम,साखर आयुक्त तथा कोविड-१९ नियंत्रण अधिकारी सौरभ राव,एनआयव्हीच्या संचालक डॉ. प्रिया अब्राहम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख तसेच शासकीय व खाजगी प्रयोगशाळेचे प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.

Related posts

पुणे शहरात ५५९ पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

ब्रेकिंग : जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी लागणार ई-पास

Vishal Khandagale

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने…

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX