पुणे शहर :- नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना गजानन एकबोटे व भाजपा युवती आघाडीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात एकूण ४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेत एकबोटे हॉस्पिटल, रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर येथे आयोजिलेल्या या शिबिराला युवक-युवतींनी कोरोनाची भिती न बाळगता चांगला प्रतिसाद दिला. आचार्य आनंदऋषीजी पुणे रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबिर आयोजिले होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, मिलिंद एकबोटे, डॉ. नंदकिशोर एकबोटे, प्रा. डॉ. गायत्री एकबोटे, संजय एडके आदी उपस्थित होते.

