Pune City News
पुणे

छत्तीसगडकडे पायी निघालेल्या ६३ मजुरांना खाजगी बस मधून केले रवाना : महापौर मुरलीधर मोहोळ

Pune City News:- विरोधी पक्षनेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेला अनुसरून आज गरोदर महिला आणि लहान मुलांसह ६३ जणांना दोन खासगी बसच्या माध्यमातून छत्तीसगडकडे रवाना केले. हे सर्व जण हिंजवडी येथून पायी छत्तीसगडकडे निघाले होते. याची माहिती विरोधी पक्षनेते यानां मिळाली होती व त्यांनी हा प्रकार पुण्याचे महापौर मोहोळ यानां सांगितले. त्यावर तातडीने या मजुरांशी संपर्क साधला असता, ते सर्व हिंजवडीहून पायी येरवड्या पर्यंत पोहोचले होते. त्यावर त्यांना आहे तिथेच थांबण्याची विनंती महापौरांनी केली. व भाजपा चे प्रभाग 3 चे नगरसेवक राहुल भंडारे व धनंजय जाधव यांनी त्यांची जेवणाची आणि इतर आवश्यक सोय केली.

या सर्व मजुरांना घराची ओढ लागल्याने त्यांना सोडवण्यासाठी २४ तासात प्रवासाची तांत्रिक परवानगी घेऊन आणि आज दुपारी १२ वाजता त्यांना दोन खासगी बसचे नियोजन करुन येरवडा येथून छत्तीसगडच्या दिशेने रवाना केले.

यावेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक राहुल भंडारे, संतोष राजगुरू, धनंजय जाधव, येरवडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक युनूस शेख, डॉ. सिद्धार्थ धेंडे, आदी उपस्थित होते.

Related posts

पासोड्या विठोबाची दानपेटी फोडली

Vishal Khandagale

पुणे शहर युवक कॉंग्रेस कडून “वर्क फ्रॉम होम” चे अवहान!

Vishal Khandagale

उपाययोजनेसाठीची माहिती दररोज अद्यावत करा : विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

Vishal Khandagale

Leave a Comment