Pune City News
पुणे

जम्बो कोविड रुग्णालयात आवश्यक सुविधांचे काम सात दिवसात पूर्ण करा; आरोग्यमंत्री

कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन जम्बो रुग्णालयातील अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) तसेच ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम तसेच इतर सर्व आवश्यक त्या सुविधांचे काम सात दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिले.

शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. सुभाष साळुंखे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

आरोग्यमंत्री म्हणाले : कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यासाठी पुण्यात जम्बो रुग्णालय उभारण्यात आले आहे.

कोविडसोबतच इतर आजार असलेल्या रुग्णांवरही उपचार होण्यासाठी प्रत्येक आजारातील तज्ज्ञ डॉक्टर तसेच कोरोनासोबतच इतर आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात यावा. औषधांचा तुटवडा होणार नाही, त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जम्बो रुग्णांलयातील सुविधेबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली.

Related posts

संपूर्ण तालुका क्वारंटाईन(विलींगीकरण)!

Vishal Khandagale

पुणेशहरात “संचारबंदी” प्रस्ताव दाखल

Vishal Khandagale

लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी’ करण्याचा निर्णय घ्या -उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

Leave a Comment