मुळशी तालुक्यातील उरवडे जवळ एसव्हीएस कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
● या आगीत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर यामध्ये १५ महिलांसह २ पुरुषांचा समावेश आहे.
● या ठिकाणी तहसीलदार अभय चव्हाण आणि पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ हे त्या कंपनीच्या परिसरात पोचलेले आहेत.
● आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. आतमध्ये अडकलेल्या मजुरांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
● आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल व स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहचलं होतं. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भत अधिकची माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत,” अशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

