Pune City News
पुणे

पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाची धुवाधार “बॅटिंग”

RAIN

पुणे शहरात आज ( सोमवारी) दुपारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच ऊन सावल्यांचा खेळ सुरू असताना अखेर दुपारी दोनच्या सुमारास पावसाने धुवाधार बॅटिंग करायला सुरुवात केली.
पुढील दोन दिवस पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता.

पुणे जिल्ह्यसह शहरात बहुतांश ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचे पहायला मिळाले.
पुढील चोवीस तासांसाठी पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागातर्फे दिला आहे.

या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने चित्र पहायला मिळाले.

पुणे शहरात पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी वाहू लागले आहे. पावसाचा जोर एवढा आहे की, चालकांना वाहने चालवताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

Related posts

निगडी येथील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुलवर शिक्षण विभागाची कारवाई

Vishal Khandagale

चाकण खून प्रकरणातील कुटुंबाचे प्रवीण दरेकर यांच्याकडून सांत्वन

Vishal Khandagale

पहिल्या क्रांतिकारी विद्यार्थिनी ; यांचा पुतळा पुणे विद्यापीठात बसवा- विजय डाकले

Vishal Khandagale

Leave a Comment