Pune City News
पुणे

धनंजय मुंडे यांच्याविरोधात भाजपचे आंदोलन

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी पुणे महिला शहर भाजपच्या वतीने जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात एकच घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.

यांच्यासह पुणे महिला आघाडी शहराध्यक्षा अर्चना पाटील, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, आदी यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी खापरे म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी निवडणुक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाला जे प्रतिज्ञापत्र सादर केले.

त्यामध्ये दुसरे लग्न आणि अपत्यांची माहिती लपवून फसवणूक  केली आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.

याशिवाय त्यांनी दुसऱ्या पत्नीच्या बहिणीवर अन्याय अत्याचार करूनही नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित असताना ते राजीनामा देत नाहीत.

त्यामुळे राज्य सरकारला जागे करण्यासाठी आणि मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा यासाठी हे आंदोलन करत असल्याचे खापरे यांनी सांगितले.

Related posts

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणार; उपमुख्यमंत्री

Vishal Khandagale

चर्चेला मिळाला पूर्णविराम; शरद पवार यांची “सिरम”ला भेट

Vishal Khandagale

पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाची धुवाधार “बॅटिंग”

Vishal Khandagale

Leave a Comment