पुणे

वायसीएम रुग्णालयात २० केएल ऑक्सिजन टँकला मंजुरी

ycm

पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालयाला ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या २० केएल ऑक्सिजन टँकला शासनानकडून परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे वायसीएमसाठी पहिला १० केएल आणि आताच नवीन २० केएल असा एकूण ३० केएल ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. सध्या वायसीएम रुग्णालयात नवीन जवळपास १२५ ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहे. पुढील आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.

या नव्याने तयार करण्यात आलेल्या २० केएल ऑक्सिजनमुळे रुग्णांना ऑक्सिजन वेळेत उपलब्ध होणार आहे. या ऑक्सिजन टँकमुळे ऑक्सिजन बेडची संख्याही वाढणार आहे. आणि हे ऑक्सिजन बेड कायमस्वरूपी उपलब्ध होणार असल्याने रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

Related posts

कोंढव्यात अवैध दारू विक्रेत्याच्या घरात १ कोटी ८५ लाखांची रोकड जप्त !

Vishal Khandagale

पुणे जिल्ह्यात १ लाख ७३ हजार ७४७ कोरोनाबाधित रुग्ण

Vishal Khandagale

कोरोना: पुणे शहराचे मार्केटेयार्ड बंद राहणार !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX