राष्ट्रीय

पंतप्रधान मोदींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक..

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे.

लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

भारत-चीन सीमारेषेवरील विवादाबाबत या बैठकीमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सोमवारी गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन हिंसक संघर्षामध्ये 20 जवान शहीद झाले होते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लडाखमधील भारत-चीन सीमेच्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केलं.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी पक्ष आहे असंही आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे.

Related posts

कोरोना: सीबीएसईच्या परीक्षेस स्थगिती

Vishal Khandagale

एक देश एक रेशन कार्ड’ योजना सुरु!

Vishal Khandagale

पीएम केअर फंडाचा हिशोब द्या !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX