Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

एक देश एक रेशन कार्ड’ योजना सुरु!

कोरोना महामारीमध्ये स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर आणि प्रवाशांसाठी काहीशी आनंदाची बातमी आहे. आज 1 जूनपासून 20 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेला सुरूवात झाली आहे.

अन्नधान्य घेता येणार : या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून त्याच्याकडे असलेल्या रेशन कार्डचा वापर करून अन्नधान्य घेता येणार आहे.

बायोमेट्रिक किंवा आधार वैधतेनंतर अन्नधान्य दिले जाणार आहे. ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा फायदा 67 कोटी लोकांना मिळणार आहे. यापूर्वी ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा पायलट प्रोजेक्ट चार राज्यांमध्ये लागू केला होता.

सर्व राज्यात योजना सुरू : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि गुजरात या राज्यांमध्ये रेशन कार्डाच्या पोर्टेबिलिटीची सुविधा दिली होती. त्यानंतर 8 राज्यात एक जानेवारीपासून या योजना आमंलात आली होती. आता उर्वरीत सर्व राज्यात ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Related posts

राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे

Vishal Khandagale

माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांनाही कोरोना’ काळात 50 लाखांचे विमा संरक्षण -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Vishal Khandagale

शंभर कोटींची मदत अतिशय तुटपुंजी : विरोधी पक्षनेते

Vishal Khandagale

Leave a Comment