Pune City News
राष्ट्रीय

मोदींची घोषणा : रोजगारनिर्मितीसाठी 50 हजार कोटी

लॉकडाउनमुळे अनेक मजूर आपल्या गावी परतले. अशाच मजूरांसाठी मोदी सरकार नव्या योजनाची घोषणा करणार आहेत. स्थलांतरीत मजूरांसाठी केंद्र सरकारने 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज तयार केले आहे.

उद्घाटन : याचा फायदा 6 राज्यातील 116 जिल्ह्यांना होणार आहे. या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, शनिवारी 20 जून रोजी बिहारमधील खगडिया गावातून होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

नाव : सदर योजनेचे नाव ‘गरीब कल्याण योजना’ असे असून पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेचा शुभारंभ करणार आहेत.

या राज्यांत योजना : बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, झारखंड अशा सहा राज्यांतील 116 जिल्ह्यांमधील ही योजना सुरू होणार आहे. 116 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी किमान 25 हजार मजूर गावी परतल्याचे केंद्राला आढळल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

रोजगाराची हमी : या योजनेचा लाभ 29 लाख मजुरांना होणार असून पुढील 4 महिने रोजगाराची हमी देणारी योजना राबवली जाणार आहे.

देशातील विविध भागातून आपल्या गावी गेलेल्या स्थलांतरीत मजुरापैकी मोठी संख्या ही महाराष्ट्रातील आहे. मुंबई, पुणे, नाशिक या भागातून मोठ्या प्रमाणात मजूर आपल्या गावी गेले आहेत. या भागात बहुतांशी मजूर हे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या भागातील होते.

Related posts

पुणे पोलीस महिला अधिकाऱ्यांना महिला दिना निमित्त कायम स्वरूपी जबाबदारी

Vishal Khandagale

3 विमानतळांच्या खाजगीकरणाला केंद्राची मंजूरी

Vishal Khandagale

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा

Vishal Khandagale

Leave a Comment