गुन्हे विषयकपिपरी चिंचवड

पतीचे कोरोनाने निधन; विरह सहन न झाल्याने पत्नीनेही केली आत्महत्या

पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील फुलेनगर येथे राहणाऱ्या खजुरकर कुटुंबावर कोरोनामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खजुरकर कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले. हा विरह त्यांच्या पत्नीला सहन न झाल्याने पत्नीनेही आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात शांतता पसरली होती.

गोदावरी गुरुबसप्पा खजुरकर( वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

गुरुबसप्पा आणि त्यांच्या पत्नी गोदावरी हे दोन मुलांसह फुलेनगर येथे राहतात. गुरुसप्पा यांचं दोन महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झाले होते. त्या दुःखातून त्यांच्या पत्नी गोदावरी सावरलीच नाही. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने घर कसे चालवायचे या विविंचनेत ती होती.

गुरुबसप्पा हे टिव्ही फिटींग, दुरुस्ती अशी काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. मात्र कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याने त्या खचल्या होत्या. त्या मानसिकतेत गोदावरी यांनी आपली शुक्रवारी (दि.१८) रोजी पहाटेच्या सुनारास गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.

त्यांना दोन मुले असून एक ११ वर्षांचा असून दुसरा ७ वर्षांचा आहे. आई आणि बाबा दोघेही सोडून गेल्याने त्यांच्या वरचे मायेचे छत्रच हरपले आहे. आता त्यांना फक्त आजीचा आधार आहे. परिसरात त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts

कोरोना! रक्त तपासणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची नावे

Vishal Khandagale

इराणमधून “234” भारतीय मायदेशात!

Vishal Khandagale

WhatsApp वर Online हुक्का विक्रीचा पर्दाफाश !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX