आरोग्यकोरोनागुन्हे विषयक

पुणेकरांनी भरला तब्बल १३ कोटी दंड

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. केव्हाही लॉकडाऊन लागू होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाही नागरिकांचा बेजाबदारपणा कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. विनामास्क फिरणा-या पुणेकरांनी आतापर्यंत तब्बल १३ कोटी १० लाख रुपयांचा दंड भरला आहे.

शहरातील आता दररोज नवीन ४  हजारांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळू लागले आहेत. महापालिका, पोलीस अधिक कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पुणे शहरात शनिवारी एकाच दिवसात तब्बल १ हजार १२९ जणांना विनामास्कची कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ५ लाख ५३ हजार ३०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली. आतापर्यंत २ लाख ६९ हजार १९९ जणांवर विनामास्कची कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १३ कोटी १० लाख ७२ हजार २०० रुपये दंड करण्यात आला आहे.

 

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय घोषणा करणार?

Vishal Khandagale

तीन प्रकारचे विशेष रुग्णालये सुरु करणार !

Vishal Khandagale

नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस तर्फे “डॉक्टर आपल्या दारी” उपक्रम सुरु !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX