शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. केव्हाही लॉकडाऊन लागू होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाही नागरिकांचा बेजाबदारपणा कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. विनामास्क फिरणा-या पुणेकरांनी आतापर्यंत तब्बल १३ कोटी १० लाख रुपयांचा दंड भरला आहे.
शहरातील आता दररोज नवीन ४ हजारांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळू लागले आहेत. महापालिका, पोलीस अधिक कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पुणे शहरात शनिवारी एकाच दिवसात तब्बल १ हजार १२९ जणांना विनामास्कची कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ५ लाख ५३ हजार ३०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली. आतापर्यंत २ लाख ६९ हजार १९९ जणांवर विनामास्कची कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १३ कोटी १० लाख ७२ हजार २०० रुपये दंड करण्यात आला आहे.

